महाराष्ट्र नवनिर्माण सेना

१६* वर्ष

सामाजिक सेवेचे

नाशिकला भारतातील सर्वोत्तम शाश्वत विकासाचे शहर बनविण्याचा ध्यास

धार्मिक , ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कृषी परंपरा लाभलेल्या आपल्या नाशिकला भारतातील सर्वोत्तम शाश्वत विकासाचे शहर बनविण्याचा तसेच विकासाची दिशा देताना शहराच्या सुयोग्य नियोजनाचा ध्यास घेतलेला आहे.

पक्षप्रवेश

"कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: । जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥"

धर्माचा ऱ्हास करण्याच्या उद्देशाने कालिकालरूपी भुजंगाने विळखा घातला होता अशा वेळेस ह्या भूमीला त्या विळख्यातून सोडवण्यासाठी जणू जगत्पालच ह्या भूमीवर अवतरला, त्या जगत्पालची, शिवरायांची विजयदुऺदुभी गर्जत राहू दे. पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे पद सोडून, राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी असंख्य सहकाऱ्यांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश घेतला. हिंदुत्व आणि मराठीपणाचे संरक्षण, जतन आणि त्याची प्रगती करणे हा ज्या पक्षाचा ध्यास आहे, "मराठी माणसाचे गोमटे" करणे हा विचारांचा आत्मा असलेल्या पक्षात प्रवेश घेतला. यावेळी सर्व सहकारी शुभचिंतकांमध्ये समाधानाचे व नवचैतन्याचे वातावरण होते.महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या हिंदू जननायक माननीय श्री राजसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत झालेला पक्ष प्रवेशाने आम्हाला बारा हत्तींचे बळ दिले.

'समस्या अनेक समाधान एक'

आपल्या प्रतिक्रिया, सुचना, आपल्या भागातील समस्या व शासकीय सेवा - सुविधांसाठी अवश्य संपर्क करावा....